जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस 2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. नुकतेच पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 31 मे 2022 रोजी शिमला येथे आयोजित गरीब कल्याण सम्मेलनात देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंच्या अकराव्या हप्त्याचे 10 करोड लाभार्थ्यांना 21 हजार करोड रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 30 हजार 92 लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. त्यात नंदुरबार 27 हजार 85, नवापूर 27 हजार 674, शहादा 31 हजार 698, अक्राणी 12 हजार 244, अक्कलकुवा 16 हजार 863 तर तळोदा 14 हजार 528 असे आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास मदत झाली असून ऐन खरीप हंगामात या रक्कमेचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई- केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवासी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर ओटीपी पध्दतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करु शकतील. तसेच आता पीएम किंसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे अधिक सहज आणि सोपी करण्यात आली आहे. तरी, सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण...
Read More