Author: Ramchandra Bari
द्रोपदी मुर्मु राष्ट्रपतीपदी विराजमान, भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा
Posted by Ramchandra Bari | Jul 21, 2022 | राजकारण, व्हिडीओ |
खान्देश ची कुलदैवत कन्हेरची कानुबाई माता यंदा उत्साहात
Posted by Ramchandra Bari | Jul 21, 2022 | व्हिडीओ |
दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | Jul 19, 2022 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2022-2023 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. या संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परीपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता.मिरज, जि. सांगली पिनकोड 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908)(भ्रमणध्वनी क्रमांक 9922577561/9975375557 येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या अधिक्षकांनी कळविले...
Read Moreभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमांचे काटेकोरपणे नियोजन करावे -जिल्हाधिकारी मनीषा खत्री
Posted by Ramchandra Bari | Jul 19, 2022 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृष्णा राठोड, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, प्रकाश थविल या महोत्सवाचे समन्वयक तथा जिल्हा पुनवर्सन अधिकारी (ससप्र) नितीन सदगीर, आदी उपस्थित होते. ???????????????????????????????????? जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे यंदा पूर्ण होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी...
Read More