Author: Ramchandra Bari
नाविन्यपूर्ण विचारातून अध्यापन करावे उपजिल्हाधिकारी श्रीमती करनवाल यांचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 17, 2022 | शैक्षणिक |
नंदुरबार (प्रतिनिधी):- शिक्षकांनी विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण विचारातून अध्ययन अध्यापन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी केले. नंदुरबार डाएट येथे आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्ह्यातील शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा नंदुरबार येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रयोजन हे iRISE (आयराईज) उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा...
Read Moreलम्पी स्कीन आजारापासून पशुंना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 17, 2022 | आरोग्य |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन डीसीज’ या साथरोगाचा रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले आहे. ‘लम्पी स्कीन डीसीज’ हा प्रामुख्याने गाई व म्हशींना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार असून देवी विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे हा आजार होतो. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगाचा प्रसार बाह्य कीटकांसह डास, माशा, गोचिड इत्यादी तसेच बाधित जनावरांच्या त्वचेवरील व्रण व नाकातील स्त्राव, दूध, लाळ, वीर्य इत्यादी माध्यमामार्फत संसर्ग असल्याने याविषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. सदर रोगाची लागण पशुपासून मानवांना होत नसल्याने पशुपालकांनी घाबरु नये. रोगग्रस्त पशुपासून उत्पादीत होणारे दूध व त्या पासून तयार होणारे पदार्थ आहारास हानीकारक नाहीत. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत. गाई, म्हशी एकत्रितपणे बांधले जात असल्यास म्हशींना स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था करावी. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात बांधू नयेत. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरीता तसेच चराई करता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थ नागरिकांचा प्रवेश टाळावा. जनावराच्या गोठ्यात औषधांची फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त भागातील जनावरांची 10 किलोमीटर परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने इत्यादीवर बंदी आणावी. बाधित परिसरात स्वच्छता ठेवून आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लेाराईट, पोटॅशिअम परमँगनेट...
Read Moreलम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Sep 17, 2022 | आरोग्य |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत असल्याने रोग प्रादुर्भाव प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील चार महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले आहे. लम्पी स्कीन डीसीज रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून 89 हजार 300 हजार गोट पॉक्स लसीची मात्रा प्राप्त झाली असून लसीचे वाटप क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गायी व म्हशींच्या वर्गातील पशुधन संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना 16 सप्टेंबर 2022 पासून जनावरांमधील रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदूपासून 5 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरुपात लसीकरणास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पशुपालकांनी पशूंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकारी ,कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून लसीकरण करून...
Read Moreमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम
Posted by Ramchandra Bari | Sep 17, 2022 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार निवासस्थानी राखीव. (स्थळ- 6, विरल विहार, खोडाईमाता रोड, नंदुरबार). सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील कामकाजाचा आढावा तसेच विविध विभागांना देण्यात येणाऱ्या निधीचा आढावा. दुपारी 2 वाजता तळोदा प्रकल्प कार्यालयातील कामकाजाचा आढावा तसेच विविध विभागांना देण्यात येणाऱ्या निधीचा आढावा. रात्री नंदुरबार येथे...
Read More