Author: Ramchandra Bari

अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरीता प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करावा. अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिल्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना अभिसरणातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये करावयाच्या कामासंदर्भात मार्गदर्शनपर चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्रास रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदिप गोलाईत, उपवनसंरक्षक के. बी. भवर, उपसचिव श्रीमती संजना खोपडे,...

Read More

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 8 ऑक्टोंबर 2022 रोजी सोयीनुसार जळगांव येथुन शासकीय वाहनाने  नंदुरबारकडे प्रयाण. नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. रविवार 9 ऑक्टोंबर 2022 रोजी  सकाळी 9 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने शहादाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता शहादा येथे आगमन व श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन यांनी आयोजित पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा जि.नंदुरबार ) दुपारी 12 वाजता शहादा येथुन  शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता नंदुरबार येथे आगमन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना अभिसरणातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये घ्यावयाच्या मार्गदर्शनपर चर्चासत्रास उपस्थिती ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार ) सोमवार दि.10 ऑक्टोंबर 2022 रोजी दिवसभर राखीव. सोयीनुसार नंदुरबार येथुन मुंबईकडे...

Read More

नवउद्योजकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शिबीर व स्पर्धेचे आयोजन

नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : नवउद्योजकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे 13 ऑक्टोंबर 2022 रोजी डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजीनिरिंग, शहादा येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकासाठी माहिती सत्र, स्थानिक उद्योजक तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण स्पर्धचे आयेाजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्या 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्तम 10 कल्पनांची स्पर्धा तज्ञ समितीसमोर होणार असून राज्यस्तरावरील विजेत्यांना 1 लाख रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळ पुरविण्यात येईल. तरी सर्व नवउद्योजक उमेदवारांनी आपल्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरुप देवून सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in  किंवा www.mahastartupyatra.in  वर भेट द्यावी असे आवाहन  कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!