नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 8 ऑक्टोंबर 2022 रोजी सोयीनुसार जळगांव येथुन शासकीय वाहनाने  नंदुरबारकडे प्रयाण. नंदुरबार येथे आगमन व मुक्काम.

रविवार 9 ऑक्टोंबर 2022 रोजी  सकाळी 9 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने शहादाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता शहादा येथे आगमन व श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन यांनी आयोजित पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा जि.नंदुरबार ) दुपारी 12 वाजता शहादा येथुन  शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता नंदुरबार येथे आगमन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि आदिवासी विकास विभागाच्या योजना अभिसरणातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये घ्यावयाच्या मार्गदर्शनपर चर्चासत्रास उपस्थिती ( स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार )

सोमवार दि.10 ऑक्टोंबर 2022 रोजी दिवसभर राखीव. सोयीनुसार नंदुरबार येथुन मुंबईकडे प्रयाण.