पदवीधर निवडणूकीसाठी सुक्ष्म नियोजन करावे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिंक निवडणुकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होत असल्याने यंत्रणेने योग्य नियोजन करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात निवडणूकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, पुलकींत सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शाहुराज मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे आदि उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील 23 मतदान केंद्रांवर निवडणूक तपशील व केंद्र क्रमांक लिहीण्यात यावेत, प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. मतदान केंद्रांवर अखंडित व्हिडीओशुटींग करण्यासाठी व्हिडीओग्राफरची नेमणूक करण्यात येवून याठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर 2 पोलींग ऑफीसरची नेमणूक करावी. मतदार यादी छापून त्या उमेदवारांना वितरीत कराव्यात. मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करावी. पोलीस विभागाने मतदान केंद्रावर आवश्यक बंदोबस्त तैनात करावा. झोनल अधिकाऱ्यांना बॅलेट बॉक्स बंद करण्याचे प्रशिक्षण तसेच केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे मतपेट्या हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात यावेत. मतदान पथकाकरिता वाहनाची व्यवस्था करावी. मतदान झाल्यानंतर मतपेट्या व संविधानिक, असंविधानिक लिफाफे व इतर साहित्य मतमोजणीच्या ठिकाणी नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था करावी. सिमावर्ती भाग...
Read More