Author: Ramchandra Bari

महिला लोकशाही दिनाचे 15 मे रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्त): महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 15 मे, 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 10.30 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित  राहून सादर करावे. असे राजेंद्र बिरारी, सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

पेन्शन पेमेंट आदेशात नाव नोंदविण्यासाठी माजी सैनिकांनी संपर्क साधावा

नंदुरबार (जिमाका वृत्त): नंदुरबार जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक पेन्शन धारकांच्या पेन्शन पेमेंट आदेशात पत्नी / जोडीदाराचे नाव नसेल अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त):नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने या दोन राज्यांतील बाजारपेठांचा सांधा म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिले जाते, त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पादन व कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर विकसित करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.             या संदर्भात स्वतंत्र बैठक घेवून त्याबातचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात बोलताना डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार हा कृषीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादन वाढीसाठी पोषक अशी पार्श्वभुमी व भौगोलिक क्षमता आहेत....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!