Author: Ramchandra Bari

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय व दुकाने आस्थापनास सुट्टी जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील 4, तळोदा तालुका 1, शहादा तालुक्यातील 41 , नवापूर तालुक्यातील 13 व नंदुरबार तालुक्यातील 15 अशा एकूण 84 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी बुधवार 17 मे 2023 रोजी रवाना करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 17 व 18 मे 2023 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच  निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना,निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किवा आस्थापना मधील मतदार, कामगारांना गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश उपजिल्हाधिकारी गोंविद दाणेज यांनी निर्गमित केले...

Read More

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे 18 व 19 मे रोजीचे आठवडे बाजार बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीमध्ये 111 सदस्यांच्या निवडणूकीसाठी गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदान  तर शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळेृ जिल्ह्यातील ज्या गावांत ग्रामपंचायत निवडणूका असतील त्या मतदार क्षेत्रात गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदानाच्या दिवशी तसेच शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

नाशिक येथे 5 जूनपासून महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्राचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या वित्त विभागांमार्फत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक यांच्यावतीने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्रमांक 101 चे  50 दिवसांचे प्रशिक्षणसत्र 5 जून 2023  ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी भि.पां.महाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये  दिली आहे.             24 जून 2015 शासन निर्णयानुसार वर्ग तीन राज्य शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शासकीय सेवेत प्रवेश करतेवेळी पदस्थापनेपूर्वी  किंवा पदस्थापनेनंतर 6 महिन्यात पायाभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. परंतू  कर्मचाऱ्यास पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्यूलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती दिली जाईल. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अर्ज 19 मे 2023 पर्यंत  सहसंचालक, लेखा व कोषागारे,नाशिक विभाग, वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक, लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. महाले यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!