Author: Ramchandra Bari

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे- सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे. युवक कल्याण योजनेतंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य  तसेच नोंदणीकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण...

Read More

माजी सैनिकांच्या समस्या निवारणासाठी 9 जूनला मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे व नंदुरबार तसेच स्टेशन हेडक्वार्टर देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबित यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवार 9 जून 2023 रोजी मेळाव्याचे आयेाजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.  या मेळाव्यात विविध रेकार्ड ऑफिसचे प्रतिनिधी, स्पर्श संदर्भातील अडचणीचे निवारण तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती, अग्निवीर भरती संदर्भातील माहिती तसेच  नेत्ररोग, नाक,कान, घसा, स्त्रीरोग, तसेच जनरल सर्जन तंज्ञ डॉक्टरामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबितांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबितांनी शुक्रवार 9 जून , 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महासैनिक लॉन्स, धुळे येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहून मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. पाटील यांनी केले...

Read More

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 6 जून,2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून  20 जून,2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!