नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे व नंदुरबार तसेच स्टेशन हेडक्वार्टर देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबित यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवार 9 जून 2023 रोजी मेळाव्याचे आयेाजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 या मेळाव्यात विविध रेकार्ड ऑफिसचे प्रतिनिधी, स्पर्श संदर्भातील अडचणीचे निवारण तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती, अग्निवीर भरती संदर्भातील माहिती तसेच  नेत्ररोग, नाक,कान, घसा, स्त्रीरोग, तसेच जनरल सर्जन तंज्ञ डॉक्टरामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवंलबितांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबितांनी शुक्रवार 9 जून , 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महासैनिक लॉन्स, धुळे येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहून मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. पाटील यांनी केले आहे.