Author: Ramchandra Bari
शहरातील अवैध फलक हटवा, भाजपाची प्रशासनाकडे मागणी
Posted by Ramchandra Bari | Jul 4, 2023 | व्हिडीओ |
मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Jul 4, 2023 | शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): उच्च शिक्षण विभागामार्फत ‘मातोश्री’ शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, होळ-मोहिदा तर्फे हवेली, शहादा येथे आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2023-2024 मध्ये इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी 14 ऑगस्ट,2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख आर.व्ही.पावरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी छापील नमुन्यातील अर्ज मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, प्रभूदत्तनगर, उंटावद, होळ-मोहिदा तर्फे हवेली (विद्याविहार कॉलनी ), ता.शहादा जि.नंदुरबार येथे 10 जुलै 2023 ते 28 जुलै,2023 या कालावधीत सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मिळतील. शासकीय वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून या वसतिगृहात प्रवेशित मुलांना मोफत निवास, भोजन करण्यात येईल. प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह साक्षांकीत करुन 14 ऑगस्ट, 2023 पर्यंत मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, प्रभूदत्तनगर, उंटावद, होळ-मोहिदा तर्फे हवेली (विद्याविहार कॉलनी ), ता.शहादा जि.नंदुरबार येथे सादर करावेत. अपूर्ण तसेच मुदतीत न आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.असे शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख आर.व्ही.पावरा यांनी कळविले...
Read Moreनंदुरबार जिल्ह्यातील 15 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध; 3 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
Posted by Ramchandra Bari | Jul 4, 2023 | इतर, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 15 नवीन रास्त भाव दुकान परवानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : नंदुरबार शहर व तालुक्यातील श्रीमती प्रतिभा करंजीकर तसेच अहिल्यादेवी संस्था, नंदुरबार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेली -2, धनंजय सोनवणे, रेखा चौधरी तसेच फ्रान्सिस जेम्स पंजाबी यांचा परवाना रद्द झाल्याने रिक्त -03, तसेच बामडोद-1, ओझर्दे-1. अक्कलकुवा तालुका : वडली-1, जुना नागरमुठा-1, भोयरा-1, खापरान-1, रेथी -1, तर शहादा तालुक्यात कमखेडा-1,शिरुड तह-1, कमरावद-1 अशा एकूण 15 नवीन रास्त भाव दुकानांची परवाना मंजूरीकरीता रास्त भाव दुकान इच्छुक असलेल्यांकडून 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती अटी व शर्ती,नियम सविस्तर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार येथे प्रसिद्ध करण्यात आली असून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://nandurbar.nic.in यावर देखील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मिसाळ यांनी दिली...
Read Moreनंदुरबार जिल्ह्याचा 25 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा
Posted by Ramchandra Bari | Jul 1, 2023 | व्हिडीओ, शासकीय |