नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): उच्च शिक्षण विभागामार्फत ‘मातोश्री’ शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, होळ-मोहिदा तर्फे हवेली, शहादा येथे आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन 2023-2024 मध्ये इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी 14 ऑगस्ट,2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख आर.व्ही.पावरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी छापील नमुन्यातील अर्ज मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, प्रभूदत्तनगर, उंटावद, होळ-मोहिदा तर्फे हवेली (विद्याविहार कॉलनी ), ता.शहादा जि.नंदुरबार येथे 10 जुलै 2023 ते 28 जुलै,2023 या कालावधीत सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मिळतील. शासकीय वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून  या वसतिगृहात प्रवेशित मुलांना  मोफत निवास, भोजन करण्यात येईल.

प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह साक्षांकीत करुन  14 ऑगस्ट, 2023 पर्यंत मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, प्रभूदत्तनगर, उंटावद, होळ-मोहिदा तर्फे हवेली (विद्याविहार कॉलनी ), ता.शहादा जि.नंदुरबार येथे सादर करावेत. अपूर्ण तसेच मुदतीत न आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.असे शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख आर.व्ही.पावरा यांनी कळविले आहे.