Author: Ramchandra Bari

नंदुरबार येथे राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  महिला व बाल विकास विभागाच्या संकल्पनेतून  महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण देवून त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी  के.डी.गावित नर्सिग स्कुल महाविद्यालय,पथराई येथे नुकतेच राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमांस जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, साईनाथ वंगारी, सर्व तालुकास्तरीय बाल विकास प्रकल्प अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संस्थेचे कल्याणी डांगे, विद्यार्थी निधी ट्रस्टचे वर्षा घाटकडवी, ऑल महाराष्ट्र तायदो असोसिएशनचे संतोष मराठे उपस्थित होते. राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 1 हजार युवतींना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात 3 जुलै, 2023 ते 15 जुलै,2023 या कालावधीत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी संघटना यांच्यावतीने 15 ते 30 वयोगटातील युवतींच्या स्वसंरक्षणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  यावेळी श्री.मराठे यांनी युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचलक श्री.रविंद्र काकलीज तर प्रस्तावना श्री.वंगारी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा पवार यांनी...

Read More

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):   महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत पदवी  व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्य व देशांतर्गत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली असून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे  नंदुरबार जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.             राज्यातील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य व देशांतर्गत  पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष तर परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष  बिनव्याजी शैक्षणिक कर्ज  योजना सुरु केली आहे. या योजनेत वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायकि व व्यवस्थापकीय,कृषी, अन्न प्रकिया व पशुविज्ञान, या संबंधातील शासनमान्य मान्यता प्राप्त विद्यापीठांनी, केंद्रीय परिषदांची मान्यता असलेल्या राज्यांतर्गत शैक्षणिक संस्थामधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे.             योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष  व परदेशी अभ्यासक्रमांसाठी 20 लक्षच्या मर्यादेत बँकेने कर्ज मंजुर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्यांने वेळेत हप्ते  भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या आधारलिंग खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येईल.             यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे. इयत्ता बारावीत 60 टक्के गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यवसायकि अभ्यासक्रमासाठी 60 टक्के गुणासह पदविका तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिंक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागकरीता 8 लक्ष असावे.             योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने www.msobcfdc.org  या संकेतस्थवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पहिला मजला,...

Read More

पेसावितरण दाखल्याचे कामकाज 10 जुलैपर्यंत बंद- मंदार पत्की

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा जि. नंदुरबार कार्यालयामार्फत स्पर्धात्मक परिक्षेसाठी पेसा दाखला वितरीत करण्याचे कामकाज अपरिहार्य कारणास्तव गुरूवार 6 जुलै, 2023 ते सोमवार दिनांक 10 जुलै ,2023 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार आहे. यासाठी तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार 6 जुलै 2023 ते सोमवार दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत बंद राहणार असल्याने याची सर्व लाभार्थी / विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी कळवले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!