नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा जि. नंदुरबार कार्यालयामार्फत स्पर्धात्मक परिक्षेसाठी पेसा दाखला वितरीत करण्याचे कामकाज अपरिहार्य कारणास्तव गुरूवार 6 जुलै, 2023 ते सोमवार दिनांक 10 जुलै ,2023 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार आहे. यासाठी तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार 6 जुलै 2023 ते सोमवार दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत बंद राहणार असल्याने याची सर्व लाभार्थी / विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी कळवले आहे.