Author: Ramchandra Bari

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटींची पुर्तता करण्यासाठी विशेष मोहिम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अडचण होऊ नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबारच्या यांच्या वतीने अपूर्णता असलेल्या प्रकरणात पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करण्यात आले असल्याचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्राची वाजे यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविलेल्या मंडणगड पॅटर्णनुसार 2 हजार 500 शैक्षणिक प्रकरणे समितीकडे प्राप्त झालेली होती, त्यापैकी 2 हजार 450 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आलेला असून जिल्हयात मंडणगड पॅटर्णनुसार सर्व तालुक्यांमध्ये 12 शिबिरे घेण्यात आलेले आहेत. “ राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व ” अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे  त्रृटी पुर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहेत.  अशा अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीव्दारे व त्रूटीचे पत्र  देऊन कळविण्यात आल्या आहेत. तथापि, अर्जदारांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहे. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलवर कळविण्यात आलेल्या त्रुटीसंह व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत उपस्थित राहावे. अर्जदारांकडून त्रृटी पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.     कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे सपंर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तिीच्या अमिशास बळी पडू नये. असे आवाहनही संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती वाजे केले...

Read More

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक वर्ष 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वसतीगृहात नंदुरबार शहरातील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीना प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून  प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सुद्धा वसतिगृह प्रवेशासंदर्भातील माहिती आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित अनुसूचित जाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. शालेय विभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जुलै,2023 तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासाठी 31 जुलै,2023 अशी आहे. प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (9527505895 / 9881903313) वर संपर्क साधावा.असे आवाहन गृहपाल श्रीमती मोरे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!