Author: Ramchandra Bari

वाहन परवान्यासाठी अक्कलकुवा तालुक्यात दौऱ्याचे आयोजन – किरण बिडकर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांच्या कच्च्या व पक्क्या वाहन परवान्याच्या (अनुज्ञप्ती) कामकाजासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 28 ऑगस्ट, 21 सप्टेंबर 26 ऑक्टोंबर, 30 नोव्हेंबर  व 30 डिसेंबर 2023 या दिवसांना अक्कलकुवा तालुक्यात मासिक दौरा होणार असल्याचेही श्री. बिडकर यांनी कळविले...

Read More

ऊसतोड कामगारांना मिळणार ग्रामपंचायतीमर्फत ओळखपत्र – देविदास नांदगावकर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ऊसतोड कामगारांचे राहणीमान  उंचावुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करण्यासाठी राहणीमान  उंचावण्यासाठी  ऊसतोड कामगांराना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे. नोंदणीसाठी ऊसतोड कामगार हा मागील किमान 3 वर्षे किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करणारा असावा. अशा ऊसतोड कामगारांना आपल्या ग्रामपंचायतीतून नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र प्राप्त केल्यानंतर ऊसतोड कामगांराना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे सुलभ होईल, असेही री. नांदगांवकर यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!