देशाला अभिमान वाटेल असे नंदुरबारचे जिल्हा संग्रहालय निर्माण करणार; रौप्य महोत्सवी वर्षात विकासाचा सर्व बॅकलॉग भरून काढणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार (जिमाका वृत्त) नंदुरबार जिल्ह्याला स्वतंत्र,समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यात नसेल एवढी बहुसांस्कृतिक अशी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे, त्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे नंदूरबार जिल्ह्याचे स्वतंत्र संग्रहालय निर्माण करणार असून या रौप्य महोत्सवी वर्षात जिल्ह्याच्या विकासाचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढू, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि.प. सभापती श्रीमती हेमलता शितोळे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, सा.बा....
Read More
