नंदुरबार (जिमाका वृत्त) : भारत सरकारच्या वतीने २५ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीतील विविध कार्यक्रमास विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्ररेणा देण्याच्या उद्दीष्टाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी करण्यासाठी https://nandurbar.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://www.nic.in/diw2023-reg/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी केल्यावर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमा विषयी सर्व अपडेट प्राप्त होईल. तसेच वरील लिंकसोबतच खालील क्युआर कोड वरून देखील नोंदणी करता येणार असल्याचेही श्री. खांदे यांनी कळविले आहे.