Author: Ramchandra Bari
आपचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Posted by Ramchandra Bari | Jul 31, 2023 | राजकारण, व्हिडीओ |
पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
Posted by Ramchandra Bari | Jul 31, 2023 | कृषी, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त) पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले...
Read Moreअण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – ताराचंद कसबे
Posted by Ramchandra Bari | Jul 31, 2023 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्त) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी वर्ष 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी लाभार्थींना थेट कर्ज योजनेत लाभ 15 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. योजनेचे स्वरुप प्रकल्प या योजनेत प्रकल्प मुल्य रूपये एक लाख असून महामंडळाचा सहभाग 85 टक्के (85 हजार) तर अर्जदाराचा सहभाग 5 टक्के (5 हजार ) राहील. यासाठी व्याज दर 4 टक्के असून परतफेडीचा कालावधी 3 वर्ष इतका राहील. पात्रतेचे निकष अर्जदार हा मातंग समाज व तत्स्मम 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षपेक्षा जास्त नसावे. अर्जदार या जिल्ह्याचा रहिवासी असावा, त्याचे सबिल क्रेडीट स्कोअर 500 असावे. अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान, अनुभव व प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला 50 टक्के आरक्षण राहील तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगती प्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास...
Read Moreसमान नागरी कायदा व मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेचे निदर्शने
Posted by Ramchandra Bari | Jul 27, 2023 | इतर |
