Author: n7news

क्षयरोग दिनी पोलिसांना हातरुमाल वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधत आज जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी रुमाल वाटप करण्यात आले आहे. 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या बॅकटेरीयाचा शोध लागला होता त्यामुळे हा दिवस क्षयरोग दिन म्हणुन ओळखला जातो. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या संचारबंदीमुळे आज सुरवातीला जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे क्षयरोगाचे संशोधक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पित करण्यात आली. यानंतर विभागाने संचारबंदीमध्ये शहरात विविध भागात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याना रुमाल वाटप केले. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तोंडाला बांधण्याजोगा हा रुमाल असून, यावर खोकतांना आणि शिंकतांना हातरुमालाचा उपयोग करा आणि सुरक्षित आणि क्षयमुक्त रहा ! असा संदेश देण्यात आला आहे. शहरभरात जवळपास अशा पद्दतीने पाचशेहुन अधिक रुमांलाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे व कर्मचारी उपस्थित...

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणी नंदुरबार जि प चे मुकाअ श्री विनय गौडा यांची माहिती

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केली आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाइन करणे, अशा उपाय योजनांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी दिली. सबंध मानवजातीवर भयावह संकट बनुन आलेल्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर विविध उपाय योजना केल्या जात असून, गेल्या तीन महिन्यांपासून करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू फैलावत असून, या आजाराच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना करत आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात तर जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी सुरू केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचीच अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, अश्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना...

Read More

‘करोना’ नियंत्रणासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये-डॉ.राजेंद्र भारूड

नंदुरबार (प्रतिनिधी) :- करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानूसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात सोमवार 23 मार्च 2020 मध्यरात्रीपासून 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश दिले आहेत. या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येतील. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधीत वाहनांना फिरण्यास अनुमती असेल. जिल्ह्यातील नागरीकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्यास अनुमती असेल. पोलिसांनी विचारणा केल्यावर योग्य कारण सांगावे लागेल व त्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल. अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा योग्य कारणांसाठी बाहेर पडल्यानंरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास अनुमती असणार नाही. अशा अत्यावश्यक कामासाठी जाताना टॅक्सी किंवा खाजगी वाहनात चालक आणि इतर दोन व्यक्तींना अनुमती असेल, तर रिक्शाचा उपयोग करताना चालक आणि एका व्यक्तीस अनुमती असेल. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतूकीला अनुमती असेल. सामान्य कामकाजासाठी ही अनुमती असणार नाही. जिल्ह्यात बाहेरील राज्याच्या बसेस किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतूक बंद असणार आहे. बँक, विमा, एटीएम, मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, पोस्ट आणि इंटरनेट सेवा, जीवनावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स, खाद्य पदार्थांची घरपोच सेवा, जीवनावश्यक वस्तू, रुग्णालये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, खाजगी सुरक्षा सेवा, करोना नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या आस्थापना, औषधे, दूध, बेकरी, अन्नधान्य, कृषी निविष्ठा, पशूखाद्य, पशूंचे दवाखान्यांशी संबंधित आस्थापना व वाहतूक सुरू राहील....

Read More

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यात अडथळा नको मध्यरात्रीपासून कलम 144 लागू होणार – डॉ.राजेंद्र भारुड

‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातदेखील याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील, त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. सोमवारी पहाटे पर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनुमती रहाणार नाही. त्यानंतरदेखील गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात शहरी भागात 144 कलम लागू करण्यात येणार असून 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही. नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची सेवा आणि बँका सुरू राहतील. बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असणार नाही. अशावेळी संबंअधित अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संपर्कात राहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल याचे नियोजन करावे. नागरिकांना आवश्यक वस्तू योग्यप्रकारे मिळतील याकडेदेखील विशेष लक्ष देण्यात यावे.नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान चांगले सहकार्य केले आहे. विषाणूचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आणखी काही दिवस गर्दी टाळावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 23 मार्चपर्यंत बाहेर रस्त्यावर येऊ नये. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नेहमीची पूजाअर्चा सुरू राहील, मात्र त्या ठिकाणी नागरिकांना एकत्र येऊ नये. पुढील सुचनेपर्यंत कोणतेही बाजार भरविण्यात येऊ नये. वाहतूक सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. ज्या नागरिकांना ‘क्वारंटाईन’ करण्यास सांगितले आहे त्यांनी इतरांपासून स्वत:ला...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!