कलाविष्कार कडून नंदुरबारात चित्रकला स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संधी
नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील कलाविष्कार प्रतिष्ठाण तर्फे कोविड-19(कोरोना) आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी इ.१ ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चिञकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोनो व्हायरसमुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेला सुट्या आहेत. या सुट्टीत विद्यार्थी दिवसभर घरात टि.व्ही., मोबाईल तसेच कॉम्प्युटर समोर बसलेले असतात. त्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी कलाविष्कार प्रतिष्ठाणतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत पालक बंधु भगिणींनी घरात बसुनच मुलांकडुन चिञ काढुन घ्यावयाचे आहे. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोनवरून संपर्क साधावा व त्यांना घराबाहेर न फिरण्याची सुचना द्यावी. या चिञकला स्पर्धेची वैशिष्ट्ये अशी, दिनांक 10 एप्रिल शुक्रवार 2020 पर्यंत चिञाचा फोटो पाठविणे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रंगीत सहभाग प्रमाणपञ व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येईल, स्पर्धा निःशुल्क आहे, आपल्या स्वतःच्या चिञकला वहिवर किंवा जो पांढरा कागद उपलब्ध असेल त्यावर चिञ काढणे.(चिञाच्या आकाराचे बंधन नाही.), चिञ कोणत्याही रंग माध्यमातून रंगवु शकतात, स्पर्धा हि दोन गटात असेल( इ.1ली ते 4 थी) व (इ.5 वी ते 10 वी), स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभाबाबत मोबाईल वर कळविण्यात येईल, स्पर्धेत (मराठी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराथी, हिंदी) माध्यमांमधिल शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात, अपुर्ण चिञ स्पर्धेत स्विकारले जाणार नाही, चिञाखाली एका बाजुला दिसेल व समजेल अशा स्वरूपात (मराठीत) स्वतःचे पुर्ण नाव, शाळेचे पुर्ण नाव, इयत्ता, तुकडी, मोबाईल नंबर सुंदर अक्षरात लिहावा, चिञाचा विषय- कोरोना (कोविड-19) आजार जनजागृती, चिञाचा चांगला काढलेला एकच फोटो आयोजकांच्या खालील दिलेल्या व्हाट्स...
Read More