दुकाने उघडण्यास केंद्र शासनाची सशर्त परवानगी
मुंबई : केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मद्य विक्रीची दुकाने आणि मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान करोना व्हायरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसंच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. ५० टक्के मनुष्यबळ, शारिरीक अंतराचे पालन, मास्क आणि हँड ग्लोव्हस्चा वापर अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली असली तरी राज्य सरकारांच्या निर्देशांची वाट दुकानदार पाहत...
Read More