Author: Amit Kapadne

बसेसला नंदुरबार ते संभाजीनगर फलक लावण्याची मागणी

नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगार प्रमुखांना निवेदन नंदुरबार – नंदुरबारहुन औरंगाबादला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला नंदुरबार ते संभाजीनगर असे फलक कायमस्वरूपी लावण्यात यावे, अशी मागणी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबारच्या आगार प्रमुखांना निवेदन देतांना. याबाबत नंदुरबारच्या आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे . त्यात म्हटले आहे की, नंदुरबार ते औरंगाबाद राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला औरंगाबाद ऐवजी नंदुरबार ते संभाजीनगर या नावाचे फलक लावण्यात यावे. राज्य परिवहन महामंडळाने सदर न लावल्यास मनसेतर्फे खर्चाने नंदुरबार संभाजीनगर असे फलक लावण्यात येतील. तसेच बसस्थानकातील प्रवासी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाध्यक्ष ईश्वर ठाकूर, जिल्हा सचिव पवन गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, शहराध्यक्ष विवेक ठाकूर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुनील कोकणी, तालुकाध्यक्ष दिनेश मराठे, कामगार सेनेचे संपर्क अध्यक्ष अतुल पाटील, दीपक चौधरी, जयदीप चौधरी, विकी चौधरी, योगेश चौधरी, अनिल चौधरी आदींनी केली...

Read More

सरकारविरोधात भाजपचा एल्गार

*नंदुरबार (जगदीश ठाकुर)*- महाआघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिलं होतं. परंतु सरकारने कुठलीही मदत न देता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. म्हणून सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून भाजपाने एल्गार पुकारला. आघाडी सरकारने दिलेले आश्वासन पाडून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी भाजपाने यावेळी केली. नंदुरबार येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राजेंद्रकुमार गावित, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी,  तालुका अध्यक्ष रवींद्र चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक कमल ठाकूर, माणिक माळी, राजेंद्र गावित, पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई पटेल, नगरसेविका संगीता सोनवणे, सविता जयस्वाल खुषाल चौधरी, पंकज पाठक, महेंद्र पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर भाजपाच्या जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात...

Read More

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणाऱ्या खर्चावर नगरसेवकांचा आक्षेप

नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबारात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च न करता मुख्यमंत्री हे शासनाच्या खर्चातून येतात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च करण्यात येऊ नये, असा आक्षेप भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत घेतला. सदरचा खर्च रकमेतून लोकांची घरपट्टी माफ करावी आणि विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा खर्च करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. या सभेत मुख्यमंत्र्यांच्या खर्चाचा विषय चांगला घातला. नंदुरबार नगरपालिकेची विशेष सभा प्रभारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भारती अशोक राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत दहा विषयांना मंजुरी देण्यात आली. असली तरी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामांच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री हे शासनाच्या पैशांनी कार्यक्रमासाठी येतात. त्यामुळे नंदुरबार पालिकेने कार्यक्रमासाठी खर्च न करता कामांचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने तो करावा अगोदरच पालिकेकडे निधी नसून खर्च करण्याची पालिकेची परिस्थिती नाही. म्हणून सदर खर्च करण्याचे टाळून त्याऐवजी लोकांची ज्यादा घरपट्टी माफ करावी अशी मागणी करून भाजपच्या नगरसेवकांनी सूचनाही मांडल्या मांडत विषयांना मंजुरी दिली. तसेच सहा वर्षापासून एकाच कंपनीला पाइप लीकेज दुरुस्तीचा ठेका दिला जात असून सदर ठेकेदाराने एकही काम केलं नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी करून चौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांचा विरोधी नगरसेवकांनी यावेळी केली. या सभेतील या सभेतील शहराच्या सुशोभीकरण अंतर्गत महिलांचे पूर्ण कृती पुतळे उभारण्यात येणार असल्याने भारताच्या माजी विदेश मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज, नंदुरबारच्या स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय कमलाताई मराठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पालिकेची सभा झाल्यानंतर नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने...

Read More

परवानगी निवासाची आणि इमारतीचे बांधकाम कमर्शियल?

नंदुरबार येथील सर्व्हे नं.451 वरील अनधिकृत इमारत तोडण्याच्या पालिकेच्या आदेशाला तिलांजली नंदुरबार- (जगदिश ठाकूर) शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात असलेल्या सर्व्हे नं.451 याठिकाणी व्यापारी गाळ्यासह इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. परंतू, असे असतांनाही पालिका मुख्याधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संबंधित मालकांनी व्यापारी गाळ्यांसह इमारतीचे बांधकाम सुरुच ठेवले असल्याचे दिसून येते. विद्यमान मुख्याधिकार्‍यांनी संबंधित मालकांना पालिकेत बोलवून इमारतीचे अनधिकृत सुरु असलेले बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या असल्यास तरी, नियमबाह्य असलेली अनधिकृत इमारत बांधकाम करणार्‍या मालकावर काय कार्यवाही होईल? याकडे लक्ष लागून आहे. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय इमारत म्हणजे सध्याची नगरपालिका इमारतीच्या पाठीमागील भागात परदेशीपूरालगत सर्व्हे नं.451 या जागेवर इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी नंदुरबार नगरपालिकेने निवास म्हणजे रेसीडेन्सीसाठी परवानगी दिली होती. परंतू, संबंधितांनी त्या परवानगीला तिलांजली देत त्या जागेवर व्यावसायिक म्हणजे कमर्शियल दृष्टीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे निवासाच्या नियमानुसार बांधकाम न करतांना व्यापारी गाळे काढून बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात पालिकेकडे सदर बांधकाम अनधिकृतपणे सुरु असल्याची यापूर्वीच तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मध्यंतरी हे बांधकाम थांबविण्यात आले होते. प्राप्त तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकारी सर्व्हे नं.451 याठिकाणी निवासाऐवजी व्यवसायिकदृष्टीने बांधकाम होणारी इमारत तोडण्याचे आदेश जारी केले होते. परंतू, या आदेशाला काही कालावधी लोटताच पुन्हा सदर मालकांनी इमारतीचे बांधकाम व्यवसायिक दृष्टीने सुरु केले आहे. टोलेजंग उभारण्यात आलेली ही इमारत पालिकेने दिलेल्या परवानगी ऐवजी नियमबाह्य बांधण्यात येत आहे. निवास ऐवजी कर्मर्शियल...

Read More

राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष

नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाली आहे. या निवड प्रक्रियेत मतदान झाल्याने शिवसेनेचे राम रघुवंशी यांना 30 मते तर त्यांचे  प्रतिस्पर्धी भाजपाच्या ज्योती पाटील यांना 26 मते मिळाली आहेत त्यामुळे उपाध्यक्षपदी राम रघुवंशी यांची वर्णी लागली...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!