नंदुरबार, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : नवउद्योजकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे 13 ऑक्टोंबर 2022 रोजी डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजीनिरिंग, शहादा येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकासाठी माहिती सत्र, स्थानिक उद्योजक तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण स्पर्धचे आयेाजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्या 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्तम 10 कल्पनांची स्पर्धा तज्ञ समितीसमोर होणार असून राज्यस्तरावरील विजेत्यांना 1 लाख रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळ पुरविण्यात येईल.
तरी सर्व नवउद्योजक उमेदवारांनी आपल्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरुप देवून सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्यावी असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी केले आहे.