नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्व. राजीव गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, रामजी राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.