नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे आज महसुल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, लाभार्थ्यांना धनादेश, विविध दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार नितीन पाटील,आर.ओ.बोरसे आदी उपस्थित होते.
या वेळी मान्यवराच्या हस्ते सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र वाहितीलायक झाल्यावर केलेल्या सातबारा उतारा फेरफार पत्रकाचे पत्रकाचे वाटप, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र , नविन शिधापत्रिका, विधता व निराधार प्राधान्य कुटूंब लाभार्थ्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत मंजूर धनादेश वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्ती खरीप 2021 चे दुष्काळ अनुदानाचे 22 कोटी 53 लक्षाचा धनादेश शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी युनियन बॅंक ऑफ इंडिया यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आला.
महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालयातील उल्लेखनिय कार्य केलेल्या नायब तहसिलदार नितीन पाटील, अव्वल कारकुन प्रिती पाटील,महसूल सहायक दौलत वळवी, मंडळ अधिकारी मदन काबळे, तलाठी बाळू धनगर, शिपाई गिरीष देवांग कोतवाल किशोर पाडवी यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी तर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी केले.