नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांसाठी अनुदाने, पर्यटन विकास योजना व इतर योजनेमधून तोरणमाळ पर्यटनस्थळ विकासासाठी मंजूरी दिलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी मनीषा खत्री काल तोरणमाळ येथे जावून पाहणी केली.
यावेळी उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, कार्यकारी अभियंता महेश पाटील,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजीव पवार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी एस.बी.कनखर आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान तोरणमाळ पर्यटन स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांची माहिती घेवून येथे नवीन रस्ते तयार करण्यासाठी कामांचे अंदाजपत्रके सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्यात.तसेच तोरणमाळ येथे नवीन पर्यटन स्थळ शोधून त्यास्थळांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी यशवंत तलाव, शासकीय विश्रामगृह, सिताखाई, खडकी पाईन्ट, बॉटणीकल गार्डन, मच्छिंद्रनाथ गुफा येथील स्थंळाना भेटी दिल्यात. व प्रादेशिक पर्यटन विकास योजना व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी करुन तेथे केलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.