नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी त्वरीत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
सन्मान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करावी. तसेच लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असल्याने 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करावी.