नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग तसेच आर सी फर्टीलायझर्स प्रा.लि.तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, कृषी उपसंचालक व्ही.डी.चौधरी, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, आर.सी.फर्टीलायझर्स कंपनी प्रा.लि.चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत एसएसपी खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती नसल्याने शेतकरी एसएसपी खताच्या फायद्यापासून वंचित राहत आहेत. तीन बॅग एसएसपी आणि एक बॅग डिएपी यांच्यासाठी शेतकऱ्यांना सारखीच रक्कम खर्च करावी लागते आणि साधारण सारख्याच प्रमाणात स्फुरदाची मात्रा पिकांला मिळत असते आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती या चित्ररथा मार्फत करण्यात येणार आहे.