नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
गुरुवार 10 फेब्रूवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता साक्री येथून नंदुरबार कडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जनसुनावणीस उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 2.30 वाजता राखीव. दुपारी 3.00 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय नंदुरबार. दुपारी 3.30 वाजता नंदुरबार शहर आढावा. सायंकाळी 5.00 वाजता नंदुरबार येथून जळगांवकडे प्रयाण.