नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील आस्थापना विभाग, संगणक कक्ष, अभिलेख कक्षाची पाहणी केली. तसेच शेत जमीन, बिनशेती मोजणी,मिळकत पत्रिकेचे संगणकीकरण, आकार बंध, टिप्पण बुक, प्रतिबुक, वसलेवार, नगर भू -मापनाकडील मोजणी आलेख,नकाशे, अधिसूचना,गावठाण भूमापनाचे ड्रोन सर्वेक्षण तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे, उपअधीक्षक स्मिता गावीत, शिरस्तेदार प्रविण दुसाने तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.