नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी धनगर समाजातील महिलांनी 30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
धनगर समाजातील सवलतीस पात्र महिला नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किमतीच्या 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बॅकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल. या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. त्यासाठी महिला लाभार्थ्यांनी जिल्हाधिकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे विहित विवरण पत्रात अर्ज सादर करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनगर समाजातील महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग, आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करत असलेल्या महिला उद्योजकांनी अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.