नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा मे  महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणार नाही.

महिला लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज अर्ज wcdnandurbar@gmail.com या ईमेलवर किंवा 9420372067 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 17 मे 2021 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठवावेत. महिला तक्रारदारांनी  प्रत्यक्षात उपस्थित रहाण्याची आवश्यकता नाही, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.