नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खांडबारा येथून रेल्वे ट्रॅकने निंबोणी गावाकडे जात असताना एक अनोळखी भिक्षुक 12 एप्रिल 2021 रोजी पहाटे 1 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान रेल्वे गाडीला ठोकला गेल्याने मृत अवस्थेत पडल्याचे आढळले आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 55 ते 60 वर्षे आहे. अनोळखी इसमाबाबत माहिती असल्यास विसरवाडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे, आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी केले आहे.