नंदुरबार  –  ग्रामपंचायत चौपाळे अंतर्गत आयोजित कोविड लसीकरण शिबिरात 45 वर्षावरील 178 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संत दगा महाराज संस्थेचे अध्यक्ष  मदनलाल जैन, गट विकास अधिकारी  अशोक पटाईत,  सागर तांबोळी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, संत दगा महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील  आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

गावातील  200 नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लस पुर्णपणे सुरक्षित असून 45 वर्षावरील सर्व ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे आणि कोरोना नियमांचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन श्री.गावडे यांनी यावेळी केले. हर्षदा गावीत यांनी ग्रामस्थांचे लसीकरण केले.