नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नंदुरबार कार्यालयामार्फत 1 फेब्रुवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीत विशेष कर्ज वसूली अभियान राबविण्यात येत आहे.
एन.एस.एफ.डी.सी योजना, थेट योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण कर्ज योजना, बीजभांडवल योजना अशा विविध योजनाअंतर्गत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लाभार्थ्यांना महामंडळामार्फत कर्ज वितरीत केले आहे. लाभार्थ्यांनी आपल्याकडील थकीत कर्जांची रक्कम कार्यालयात येवून भरावी. तसेच कर्ज वसूलीसाठी येणाऱ्या वसुली अभियानाच्या पथकास कर्जाची रक्कम भरुन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नंदुरबार यांनी केले आहे.