नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांनी ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2021 पासून ई-एपीक (इलेक्ट्रानिक ओळखपत्र ) सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहिमेत नाव नोंदविलेल्या मतदारांना 25 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
आता ही सुविधा 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमापुर्वीच्या सर्व मतदारांसाठी केवासीची सुविधा आयोगामार्फत तारीख जाहीर केल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येईल.