नंदुरबार – लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना लस देण्यात येत आली. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंददेखील घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना 30 मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
जिल्हा रुग्णालयासह अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे 75 कुप्या (750 डोस), म्हसावद 170 (1700 डोस), नवापूर 85 (850 डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या 120 कुप्या (1200 डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.