नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन 2020 निधी संकलनाचा शुभारंभ 15 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृह येथे आयोजित केला आहे.
कार्यक्रमास जिल्ह्यातील युध्द विधवा, वरीमाता/वीरपितांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवसापासून राज्य आजी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांप्रती त्यांनी केलेल्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
कोविड-19 मुळे मर्यादित संख्येत शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी धुळे तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नंदुरबार प्रमोद भामरे यांनी कळविले आहे.