नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरावर शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सदस्य सचिव जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.