नंदुरबार (प्रतिनिधी) – राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान दिनांक 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण रुग्ण शोध अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, सहायक संचालक तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे व कर्मचारी उपस्थित होते.क्षयरोग/कुष्ठरोग शोध अभियान 2020-21 मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण/क्षयरुग्ण शोधुन उपचाराखाली आणून समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी मोहिमेत