नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषि विभागामार्फत कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत सन 2020-2021 साठी आकांक्षित जिल्ह्याकरिता कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांना अनुदान देण्यात येते. इच्छुक गटांनी 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहीत प्रपत्रात अर्ज सादर करावे.
भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सुविधा देण्यासाठी कृषि औजारे बँक स्थापन करायची आहे. त्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चतम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे पात्र गटास वितरीत करण्यात येईल. मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी दिली आहे.