नाशिक (विमाका ) : नंदुरबार येथील अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच प्रसार भारतीचे नंदुरबार प्रतिनिधी निलेश पवार यांनी कोरोनाशी यशस्वी झुंज देवून कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे नाशिक विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.


यावेळी नंदुरबार येथील खान्देश गौरवचे संपादक हिरालाल चौधरी, नाशिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी मोहिनी राणे, माहिती सहायक किरण डोळस, दुरमुद्रणचालक संजय बोराळकर उपस्थितीत होते.


श्री. पवार यांचे अभिनंदन करतांना उपसंचालक श्री. राजपूत म्हणाले, कोरोनाच्या काळात नंदुरबार सारख्या दुर्गम ठिकाणी जनतेला पत्रकारितेच्या माध्यमातून अहोरात्र कोरोनाविषयीची माहिती पोहचविण्याचे काम श्री. पवार यांनी केले. त्याकाळातचं त्यांना कोरानाची लागण झाली असल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी नंदुरबार येथील सामान्य रुग्णालयात तात्काळ उपचार घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शन व उपचाराखाली ते कोरोनामुक्त झाले. भविष्यातही त्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच जनतेलाही स्वत:ची काळजी घेण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करावी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने शुभेच्छा, असेही ते म्हणाले.