नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय हरित लवादाने प्रत्येक गावात एक तळे, गाव तलाव, पाझर तलाव, यासारख्या जलसाठ्याचे पुर्नजीवन करण्याचे आदेश दिले असल्याने गावात अस्थित्वात असलेल्या एका जलसाठ्याचे पुर्नजीवन करावे, पुर्नजीवनाचे काम झाले असल्यास त्याची माहिती त्वरीत सादर करावी. असे प्रतीपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित लवादा संदर्भातील बैठकीत ते बोलत होते,बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी बबन काकडे,सुदीर खांदे,उपवनसरंक्षक सुरेश केवटे, आदि उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणि भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी ही कामे महत्वाची आहे. जलयुक्त शिवार, लोकसहभाग,आणि मनरेगाच्या माध्यमातुन अशी कामे जिल्ह्यात झाली आहेत. एखाद्या गावात झाली नसल्यास ती मनरेगा आणि लोकसहभागाच्या माध्यमातुन करण्यात यावीत. झालेल्या सर्व कामाची माहिती त्वरीत सादर करावीत असे त्यांनी सांगितले. श्री.काकडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून हरित लवादाच्या निर्देशाची माहिती दिली.