नंदुरबार (जिमाका वृत्त) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी आज 29 ऑगस्ट 2023 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शहादा तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10-30 ते दुपारी 1-00 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहादा तालुक्यातील सर्व वाहनचालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा व नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही श्री. बिडकर यांनी केले आहे.