नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 15 नवीन रास्त भाव दुकान परवानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : नंदुरबार शहर व तालुक्यातील श्रीमती प्रतिभा करंजीकर तसेच अहिल्यादेवी संस्था, नंदुरबार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेली -2, धनंजय सोनवणे, रेखा चौधरी तसेच फ्रान्सिस जेम्स पंजाबी यांचा परवाना रद्द झाल्याने रिक्त -03, तसेच बामडोद-1, ओझर्दे-1.
अक्कलकुवा तालुका : वडली-1, जुना नागरमुठा-1, भोयरा-1, खापरान-1, रेथी -1, तर शहादा तालुक्यात कमखेडा-1,शिरुड तह-1, कमरावद-1 अशा एकूण 15 नवीन रास्त भाव दुकानांची परवाना मंजूरीकरीता रास्त भाव दुकान इच्छुक असलेल्यांकडून 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
अधिक माहिती अटी व शर्ती,नियम सविस्तर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार येथे प्रसिद्ध करण्यात आली असून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://nandurbar.nic.in यावर देखील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मिसाळ यांनी दिली आहे.