नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वा निमित्त ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीयांसाठी गुरुवार 20 एप्रिल,2023 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच तृतीयपंथीयांना उद्योजक होऊन आत्मनिर्भर व्हावे याकरीता जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता शिबीराचे आयेाजन केले आहे. तरी या शिबीराचा ज्येष्ठ नागरिक व तृतीय पंथीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.