नंदुरबार (जिमाका वृत्त) – प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीचा जिल्हास्तरावरील कार्यक्रम 22 डिसेंबर 2023 रोजी तळोदा तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने सर्व कंपन्यांचे विक्री अधिकारी 22 ते 24 डिसेंबर या कालावधी उपस्थित राहणार असून ज्या ग्राहकांच्या समस्या असतील त्यांनी एचपीसी कंपनीचे विक्री अधिकारी सागर चव्हाण भ्रमणध्वनी क्रमांक 7709240437 व ईमेल [email protected] , आयओसी कंपनीचे विरेंद्र अहिरवार भ्रमणध्वनी क्रमांक 8010791969 व ईमेल [email protected] तसेच बीपीसी कंपनीचे पवन भारती भ्रमणध्वनी क्रमांक 8128682291 व ईमेल [email protected] त्यांच्याशी संपर्क साधावे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.