शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू जिल्ह्यात साडेपाच हजार क्विंटल तांदळाचे मोफत वाटप
नंदुरबार (प्रतिनिधी) - प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 22 हजार 305 कार्डधारकांना 5461 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 2 लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यास 15 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते. प्रधान्य कुटुंबातील लाभार्थ्यास 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ देण्यात येतो. अक्कलकुवा तालुक्यातील 34 हजार 294 शिधापत्रिका धारकांना ( 8446 क्विंटल), अक्राणी 20 हजार 281 (5150 क्विंटल), नंदुरबार 56 हजार (13640 क्विंटल), नवापूर 42 हजार 554 (10340 क्विंटल), शहादा 49 हजार 950 (12267 क्विंटल) आणि तळोदा तालुक्यातील 25 हजार 62 कार्डधारकांना 6350 क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 87 टक्के...
Read More