Month: January 2020

जी.टी.पाटील महाविद्यालयात “काव्यवाचन”

नंदुरबार- मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयक जागृती व्हावी या उद्देशाने जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” यानिमित्ताने काव्यवाचन उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून पाणी, पर्यावरण या विषयावर कविता सादर करून, विद्यार्थ्यांना “पाणी अडवणे व जिरवण्याची आवश्यकता असल्याचा संदेश दिला. तसेच या काव्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत काव्यवाचन कार्यक्रमातून प्रतिभावान कलावंतांना संधी मिळून, ते स्वतःला घडवत असतात, म्हणून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशा प्रकारचा विचार मांडला. काव्यवाचन कार्यक्रमात समाधान वाघ, कमलेश महाले, दीप पाटील, दर्शन भावसार, गौरव पुंडे, मंदाराणी सूर्यवंशी, रोशनी कोकणी, कासिम पठाण कल्याणी कळकटे रोहिणी कोकणी, शुभम सोनार, प्रतिक कदम या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर करत त्यांनी प्रेमविषयक, सामाजिक, राष्ट्रप्रेमविषयक या विषयीच्या भावना, जाणिवा यांचा उत्स्फूर्तपणे आविष्कार केला. त्यांच्या काव्याच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.माधव कदम यांनी हसतखेळत, विनोदाची उधळण करत केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश अर्जुन भामरे, डॉ. विजया पाटील, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, प्रा.एन.आर.कोळपकर, प्रा. शुभांगी देवकर, प्रा.महेंद्र गावित, प्रा. जितेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती...

Read More

जेएनयूच्या निषेधार्थ आरपीआय युवक आघाडीची निदर्शने

नंदुरबार (जगदीश ठाकुर)- जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या युवक आघाडी च्या वतीने दि.10 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशाने विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी JNU मधील हिंसाचार करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करा, महाराष्ट्र शासनाचे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंद्यासाठी देण्यात आलेले सर्व महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे,शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफी करून 7/12 कोरा करण्यात यावा, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, नंदुरबार युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तेजी, नंदुरबार शहराध्यक्ष सुलतान पिंजारी, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, नंदुरबार तालुका युवक उपाध्यक्ष गणेश पवार, नंदुरबार युवक शहर उपाध्यक्ष गणेश शिरसाठ, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुवर, गौतम पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष गौतम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेंद्र बिरारी, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष बापू महिरे ,युवक शहराध्यक्ष रवींद्र रामराजे शहादा, नंदुरबार युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार, शहादा युवक तालुकाध्यक्ष दीपक अहिरे, युवक तालुका उपाध्यक्ष विनोद सामुद्रे, तळोदा तालुकाध्यक्ष बिल्डर अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुक्तार मिस्तरी व रिपाई (आठवले ) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!